Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय सेनादलांना मानवाधिकारांबद्दल अत्युच्च आदर असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सेना दलांना मानवाधिकारांप्रति अत्युच्च आदर असून केवळ स्वदेशातल्याच नव्हे तर शत्रू देशातल्या जनतेच्या मानवाधिकारांचं रक्षण ती करतात असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे ‘युद्धकालीन मानवाधिकार रक्षण आणि युद्ध कैदी’ या विषयावर त्यांचं व्याख्यान काल नवी दिल्लीत झालं. त्यात ते म्हणाले की माणुसकी आणि सभ्यता या तत्वांचं धर्मनिरपेक्षपणे पालन सेनादलांमार्फत केलं जातं.

दशहतवाद आणि सशस्त्र उठावाच्या घटना हाताळणं दिवसेंदिवस कठीण होत आहे असं सांगून ते म्हणाले की भारतीय सेना दलं कटाक्षाने फक्त दहशतवादी आणि बंडखोरांना कौशल्याने टिपून काढतात आणि सामान्य निष्पाप नागरिकांना इजा होऊ नये याची काळजी घेतात.

Exit mobile version