नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूचीला विरोध करणारे लोक सत्याचा डोंगर छोट्या छोट्या झुडपांनी झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपनं मुंबईत काढलेल्या मोर्चा दरम्यान वार्ताहरांशी ते बोलत होते. भारतातले मुसलमान देशाबद्द्दल असलेलं प्रेम आणि कर्तव्यांमुळे भारतात राहतात, अन्य कसल्याही आसक्ती मुळे नाही.
काही संकुचित वृत्तीचे लोक स्वतःच्या फायद्यासाठी या कायद्याचा अपप्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नरेंद्र मोदींचं सरकार कसलाही भेदभाव न करता विकास कामं करत असल्याचं ते म्हणाले.