नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या सात जवानांना नौदलाची संवेदनशील माहिती सोशल मीडियाद्वारे शत्रूच्या गुप्तचर संस्थांना पुरवताना पकडण्यात आले होते, या घटनेनंतर आता नौदलाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
आंध्रप्रदेश पोलिसांनी २० डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या व हेरगिरी करणारे एक रॅकेट उद्धवस्त करत, यात सहभागी असल्याचे आढळलेल्या नौदलाच्या सात जवानांना अटक केली होती. आंध्रपदेश पोलिसांच्या गुप्तरच विभागाने केंद्रीय गुप्तचर संस्था व नौदलाच्या गुप्तचर विभागाच्या मदतीने ‘ऑपरेशन डॉल्फिन्स नोज’ राबवत हे रॅकेट उद्धवस्त केले होते.