नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्यंलंडचे प्रधानमंत्री लिओ वराडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या मूळ गावाला भेट दिली. २०१७ मधे आर्यंलंडचे प्रधानमंत्री झाल्यानंतर लिओ यांची मालवण तालुक्यातल्या वराड या गावाला दिलेली ही पहिली भेट असल्याचं त्यांच्या मुंबईतल्या नातेवाईंकांनी सांगितलं.
गावक-यांनी अत्यंत प्रेमानं आणि आपुलकीनं लिओ याचं स्वागत केलं. त्यांचे वडिल अशोक वराडकर यांनी ६० च्या दशकात इंग्लंड मधे स्थलांतर केलं होतं.