नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोग आज नवी दिल्लीत भारताच्या शाश्वत विकासाबाबतचा निर्देशांकाची दुसरी आवृत्ती जारी करणार आहे. या निर्देशांकामध्ये २०३० वर्षापर्यंत शाश्वत विकासाचं लक्ष्य प्राप्त करण्यात भारतातली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रगतीचा आढावा असेल.
उद्दिष्टांच्या नीती आयोग ‘डॅशबोर्ड’ २०१९-२० अर्थात ‘डिजिटल माहिती फलक’ सुद्धा जारी करणार असून त्यामध्ये शंभर मानकांवर आधारित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रगतीचं परिक्षण केलं जाईल. हे मानक सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं तयार केले आहेत.
देश, राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांनी शाश्वत विकासाचं लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं काय करत आहेत आणि हे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांना किती अवधी लागणार आहे, याची माहिती निर्देशांक देणार आहे.