Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रियंका गांधी यांना सुरक्षा पुरवण्यात कसलाही कसूर झाला नसल्याचं सीआरपीएफचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना नुकत्याच त्यांच्या लखनौ दौर्‍यात सुरक्षा पुरवण्यात कसलाही कसूर झालेला नाही, असं सीआरपीएफ अर्थात, केंद्रीय राखीव पोलीस दलानं सांगितलं. प्रियंका गांधी यांना झेड सुरक्षे अंतर्गत सीआरपीएफतर्फे सशस्त्र कमांडोज पुरवले जातात.

लखनौ दौर्‍यात प्रियंका गांधी यांनी काही अनपेक्षित हालचाली केल्या. त्यामुळे त्या काळात आगाऊ सुरक्षा व्यवस्था करता आली नाही. या प्रवासात प्रियंका गांधी यांनी व्यक्तीगत सुरक्षा अधिकार्‍याविना बुलेटप्रुफ नसलेल्या वाहनाचा वापर केला, असं सीआरपीएफनं सांगितलं.

Exit mobile version