नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी सर्व प्रकारची वैयक्तिक माहिती, एकाच माहिती संकलन केंद्रात एकवटणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. कोलंबो इथं माहिती आणि दूरसंपर्क तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकार्यांसह झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
त्यामुळे राष्ट्रीय ओळखपत्र, वाहनचालक परवाना, परदेश प्रवासांची कागदपत्रं जन्म-मृत्यू नोंदणी तसंच प्रमाणपत्रं जारी करणे यांसारख्या आवश्यक नागरी सेवा पुरवण्यात वेळ, श्रम आणि पैसा वाचवता येईल, असं ते म्हणाले.