Site icon साप्ताहिक एकच ध्येय

माल वाहतूकदारांनी ‘कॉमन कॅरिअर’ म्हणून नोंदणी प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन

मुंबई : माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकीटे/ मालाची घरपोहोच वाहतूक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यवसायिक यांना कॉमन कॅरिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे, असे मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

कॅरेज बाय रोड अधिनियम, 2007 च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2011 रोजीच्या अधिसूचनेनुसार कॅरेज बाय रोड नियम, 2011 प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे नियम अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या दिनांकापासून लागू झाले आहेत. हे नियम केंद्र शासनाच्या www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उपरोक्त सर्व संबंधितांनी मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे संपर्क साधून हे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. अन्यथा मोटार वाहन अधिनियम तसेच नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

Exit mobile version