Site icon साप्ताहिक एकच ध्येय

असममधल्या मूळ लोकांच्या जमीन आणि घरांचं रक्षण राज्य सरकार करत असल्याची असमचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : असममधे आदिवासी जमातींच्या मूळ मालकीची जमीन त्यांच्याकडे राहील, अशी ग्वाही असमचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे. ते काल जोरहाट जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

सत्तेवर आल्यापासून आपलं सरकार असमच्या जनतेच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी काम करत आहे; विशेषतः राज्यातल्या मूळ रहिवाश्यांचे जमिनीबाबतचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकारनं एक भू-धोरण स्वीकारलं आहे.

राज्य सरकारनं सुरु केलेलं भू-सर्वेक्षण, बाहेरच्या लोकांना जमिनी विकण्यासाठी असल्याची भीती काही हितसंबंधी गट करत आहेत, मात्र तशी भीती बाळगण्याचं कारण नाही, असं ते म्हणाले.

Exit mobile version