Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वस्तू आणि सेवाकराच्या दरांमधली कपात आजपासून लागू होणार, २३ वस्तू आणि सेवा होणार स्वस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे कमी केलेले दर लागू होत असल्यानं आजपासून 23 वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत. चित्रपटाची तिकिटं, टीव्ही आणि मॉनिटर स्क्रिन, पॉवर बँक, यांचा त्यात समावेश आहे.

या 23 वस्तू आणि सेवांचे कर दर कमी करण्याचा, तसंच संगीत विषयक पुस्तकं, साठवणूक केलेल्या भाज्या, आणि जन धन योजनेसाठी बँकांमधली बचत खाती, यांना करातून सूट द्यायचा निर्णय जीएसटी परिषदेनं 22 डिसेंबरला घेतला होता.

28 टक्के कराच्या स्लॅबचं सुसूत्रिकरण करताना समितीनं अनेक वस्तू त्यातून हटवून 18 टक्क्याच्या स्लॅबमधे आणल्या आहेत.

Exit mobile version