Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालकपदी श्री. शंकर गणपत पवार यांची नियुक्ती

पिंपरी : श्री. शंकर गणपत पवार, सभासद, पुणे महानगरपालिका, यांची नुकतीच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे-महापौर व श्री. विलास मडिगेरी-सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड मनपा यांचे हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. 

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. च्या व्यवस्थापकीय रचनेमध्ये सभासद, पुणे महानगरपालिका हे पदसिद्ध संचालक आहेत. मा.श्री.सिद्धार्थ शिरोळे, आमदार हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले असल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मा. श्री. शंकर गणपत पवार यांची कंपनी कायदा २०१३ मधील तरतुदीनुसार पुणे महानगर परिवहन मंहामंडळ लि. पुणे च्या संचालक मंडळावर संचालक पदी नियुक्ती करणेत आल्याने त्यांचा सत्कार समारंभ महापौर कक्षात आयोजित करण्यात आला.

Exit mobile version