Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्यावतीनं मुंबई पोलीस अधिकारी, कर्मचाराच्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्यावतीनं मुंबई पोलीस अधिकारी, कर्मचाराच्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत भूमिपूजन झालं. पोलीस महासंचालक बिपिन बिहारी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाची माहिती दिली.

या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुलासह सुविधायुक्त ४४८ सदनिकांचं बांधकाम करण्यात येणार आहे. सात मजल्यांच्या सोळा इमारती या परिसरात उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बदलत्या काळानुसार पोलिसांपुढे मोठी आव्हानं आहेत, त्याचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे रहावं लागेल, म्हणूनच सर्वोत्तम प्रशिक्षण, तसंच अत्याधुनिक सुविधांचं पाठबळ पोलीस दलाला दिलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

राज्य पोलिस दलाचा स्थापना दिन राज्यभरात साजरा केला जात आहे. यानिमित्त औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीनं आजपासून आठ जानेवारीपर्यंत पोलिस विभागाच्या कामकाजाबाबत आणि विविध शाखांबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर सकाळी दहा वाजता आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे.

Exit mobile version