नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोविंद सिंग यांची ३५३ वी जयंती बिहारमध्ये धार्मिक वातावरणात साजरी होत आहे. गुरु गोविंद सिंग यांचं जन्मस्थान असलेल्या पटणा साहेब इथल्या तख्त श्री हरमंदिर साहेब गरुद्वारात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन केलं असून, हजारो भाविक इथं प्रार्थना करीत आहेत.
पाटणा साहेब इथं १६६६ साली जन्मलेले गुरु गोविंद सिंग शिख संप्रदायाचे दहावे गुरु आहेत. आपले वडील गुरु तेगबहादूर सिंग यांच्या पश्चात वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी शिखांचं नेतृत्व स्विकारलं. अध्यात्मिक नेते, तत्वनेते, कवी आणि महान योद्धा असलेल्या गुरु गोविंद सिंगांचं शिख संप्रदायात मोठं योगदान आहे.