नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधल्या इराण समर्थकांनी बगदादस्थित अमेरिकेच्या दूतावासाला घातलेला घेराव उठवला आहे. हाशिद-अल-शाबी या निमलष्करी दलानं हस्तक्षेप करत घेराव हटवण्याचे निर्देश दिले होते.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात हाशिदचे २४ जण मारले गेल्याच्या निषेधार्थ हजारो इराकी समर्थकांनी मंगळवारी अमेरिकन दूतावास परिसरात तोडफोड केली, तसेच घेराव घातला होता.