Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ऑस्ट्रेलियातल्या न्यू-साऊथ वेल्समध्ये आगीच्या शक्यतेमुळे आठवडाभरांची आणीबाणी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातल्या न्यू-साऊथ वेल्समध्ये आगीच्या शक्यतेमुळे आठवडाभरांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या सप्ताहाअखेरिस तापमान वाढ, वादळीवार्‍यांसह मोठ्या आगीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सप्टेंबरपासून आतापर्यंत न्यू-साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया परिसरात लागलेल्या आगीत अठरा जणांचा मृत्यू झाला आहे, तर बाराशे घरं दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. या आठवड्यात लागलेल्या आगींच्या घटनामुळे सतराजण बेपत्ता झाले आहेत.

हजारो लोक या भागातून स्थलांतर करत असून, काही ठिकाणी नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला लागलेल्या आगीनंतर या भागातल्या पर्यटकांना याआधीच बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version