Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यातल्या मुंडे गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे सुपूत्र शहीद नाईक संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थीव देहावर सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या मुंडे या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले.

अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचं पार्थीव आज त्यांच्या मूळ गावी आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरमधल्या राजौरी जिल्ह्यात शिरलेल्या अतिरेक्यांचा शोध घेत असताना, झालेल्या चकमकीत नाईक संदीप सावंत यांच्यासह रायफलमन अर्जुन थापा मगर हेही शहीद झाले.

Exit mobile version