नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इराणचा कमांडर कासीम सुलेमानी मारला गेल्याच्या घटनेचा बदला घेऊ, अशी धमकी इराणनं दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका मध्यपूर्व आशियात आणखी ३ हजार सैनिकांना पाठवणार आहे.
इराकची राजधानी बगदाद इथल्या अमेरिकी दुतावासावर इराण समर्थक, निदर्शक आणि अतिरेक्यांनी केला होता. त्यानंतर अमेरिकेनं ७०० सैनिकांचा ताफा कुवेतमध्ये पाठवला होता. मागच्यावर्षी इराण अमेरिकेच्या मालमेत्तेवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती उघड होती.
त्यानंतर अमेरिकेनं मागच्या वर्षीच्या मे महिन्यापासूनच आत्ता पाठवलेल्या सैन्यांव्यतिरिक्त १४ हजार सैनिकांना मध्यपूर्व आशियात तैनात केलेला आहे.