Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पाकिस्तानमधल्या नानकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या दगडफेकीचा भारतानं केला तीव्र निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीखांचे धर्मगुरु श्री गुरु नानक देवजी यांच्या पाकिस्तानमधल्या नानकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या दगडफेकीचा, भारतानं तीव्र निषेध केला आहे. शीख समाजाची सुरक्षा आणि हित जपण्यासाठी पाकिस्तान सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत असं आवाहन भारतानं केलं आहे.

गुरु नानक देवजी यांचं जन्मठिकाण असलेल्या पवित्र शहरात अशा प्रकारची घटना घडावी, हे निंदनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तानला सुनावलं आहे. पवित्र गुरुद्वाराचा अपमान करुन अल्पसंख्य शीख समुदायावर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतानं केली आहे.

नानकसाहेब गुरुद्वारा ही वास्तू आणि तिथल्या परिसराच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, असंही भारतानं म्हटलं आहे.

Exit mobile version