नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या पाच वर्षात घेतलेल्या प्रमुख घोरणात्मक निर्णयांमुळे २०१९ या वर्षात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं उल्लेंखनीय कामगिरी केली आहे. वर्ष २०१८-१९ या कालावधीत अंदाजे ५ हजार ४९४ किलोंनीटर लांबीच्या प्रकल्पाना मंजुरी देण्यात आली, तर १० हजार ८५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलं.
२०१३-१४ मध्ये दररोज अंदाजे ११ पूर्णांक ७ दशांश किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जायचे, यात वाढ होऊन सध्या हे प्रमाण ३० किलोमीटरवर गेलं आहे.राष्ट्रीय महामार्गांची लांबी ९१ हजार किलोमीटरवरून वाढून १ लाख ३२ हजार किलोमीटर इतकी झाली आहे. पुढल्या पाच वर्षात आणखी ६० हजार किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्याचा मंत्रालयाचा प्रस्ताव आहे.