Site icon साप्ताहिक एकच ध्येय

औरंगाबाद शहरात ९ ते १२ जानेवारी दरम्यान ‘अँँडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या, कलाग्राम आणि गरवारे क्रीडांगणावर येत्या ९ ते १२ जानेवारी दरम्यान ‘अँँडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ हे औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रिकल्चर, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रदर्शनात मराठवाड्याबरोबरच राज्य आणि परराज्यातील, ४४४ उद्योग आपली उत्पादने प्रदर्शित करणार असल्याचं ते म्हणाले.

या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, तर समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Exit mobile version