Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इराणचे लष्करी कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येच्या निषेधार्थ इराकच्या प्रधानमंत्र्यांनी इराकमधे तीन दिवसांचा दुखवटा केला जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा कमांडर कासीम सुलेमानी, इराकी मिलिशिया नेता अबू महदी अल मुहंदस, तसेच आणि इतर जण मारले गेल्यानंतर इराकचे प्रधानमंत्री आदिल अब्दुल महदी यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यात शहीदांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी हा दुखवटा जाहीर केला असल्याचं इराकच्या प्रधानमंत्री कार्यालयानं निवेदनही जारी केलं आहे. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकेच्या अंताची सुरुवात झाली आहे असं इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

Exit mobile version