नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणचा सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानींच्या हत्येचं प्रत्युत्तर दिल्यास अमेरिका इराणवर अभूतपूर्व हल्ला करील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या टिपण्णीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरुन हा इशारा दिला आहे. जर इराणनं अमेरिकन व्यक्ती अथवा मालमत्तेवर हल्ला केला, तर अमेरिका इराणच्या काही महत्त्वपूर्ण ठिकाणांसह ५२ ठिकांणांना लक्ष्य करील, असा इशारा इराणनं दिला.
सोलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव वाढला आहे. इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खोमेनी यांच्यानंतर सर्वाधिक शक्तीशाली नेता म्हणून सोलेमानी यांची ओळख होती. खोमेनी यांनी आपल्या लष्कर प्रमुखाच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली होती.