Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमेरिकेबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०१५ च्या अणूकरारांतर्गत निर्बंधांचं पालन न करण्याचा इराणचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणू संवर्धन, क्षमता आणि स्तर वाढवणं तसंच संशोधन आणि विकासाशी संबंधित निर्बंधांचे पालन करणार नाही, असं इराणच्या मंत्रिमंडळानं जाहीर केलं आहे. २०१५ च्या अणूकराराअंतर्गत इराण आपल्या संवेदनशील अणू कार्यक्रम सिमित करणं आणि कठोर आर्थिक निर्बंध हटवण्याच्या बदल्यात आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना चौकशीची परवानगी देण्याबाबत इराणनं तयारी दर्शवली आहे.

इराणचे कमांडर कासिम सोलेमानी यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होण्यापूर्वी त्यांना एक वीर योद्धा म्हणून सन्मान देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं इराणचे नागरिक जमा झाले होते. तत्पूर्वी इराणच्या संसदेनं शुक्रवारी बगदाद विमानतळावर ड्रोन हल्ल्यात कमांडर सोलेमानी यांचा मृत्यू झाल्यानंतर परदेशी सैनिकानी देश सोडण्यासंबंधी प्रस्ताव मंजूर केला.

युरोपिय संघटनेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी या अणूकराराबाबत चर्चा करण्यासाठी तसंच इराणमधला तणाव दूर करण्यासाठी इराणचे परराष्ट्रमंत्री महम्मद जावेद झारिफ यांना ब्रुसेल्स इथं येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

Exit mobile version