Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लखनऊ इथं प्रथमच संरक्षण प्रदर्शन २०२० येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भरणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथं प्रथमच संरक्षण प्रदर्शन २०२० येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भरणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण कंपन्यांचा सहभाग, प्रदर्शनाचं क्षेत्र आणि मिळवण्यात येणारा महसूल या दृष्टीनं देशातलं हे आतापर्यंतचं हे सर्वात भव्य प्रदर्शन असेल,असंही ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रदर्शनाचं उद्घाटन करतील. लखनऊ इथं हे प्रदर्शन दोनशे एकर क्षेत्रावर भरवलं जाईल, असं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं. जवळपास, दीडशे परदेशी कंपन्यांसह ९२५ कंपन्यांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे.

२५ देशांमधले संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. राजनाथ सिंग यांनी सांगितलं की, १३५ देशांना निमंत्रण दिलं असून त्यापैकी ७० राष्ट्रांनी सहभाग घेण्याचं निश्चित असल्याचं कळवलं आहे.

Exit mobile version