नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनें अंतर्गत आधार संलग्न नसणाऱ्या सभासदांची यादी संबंधित तहसिल कार्यालयात प्रसिध्दीसाठी सादर करण्यात आली आहे.
तरी संबंधित शेतकऱ्यांनी यादीत आपलं नाव असल्यास त्वरीत आधार कार्ड, बँक पासबुकचं पहिलं पान, मोबाईल क्रमांक नजिकच्या बँक शाखा किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत सादर करुन आधार कार्ड बँकेशी लिंक करावं ,असं आवाहन भंडार्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन आणि जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी केलं आहे.