Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इराकमधनं आपलं सैन्य मागं घ्यायचा निर्णय अमेरिकी प्रशासनानं घेतला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधनं आपलं सैन्य मागं घ्यायचा निर्णय अमेरिकी प्रशासनानं घेतला आहे. या आशयाचं पत्र इराकमधले अमेरिकी कृती दलाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल विल्यम सिली यांनी इराकच्या संयुक्त कारवाई दलाच्या प्रमुखांना पाठवलं आहे.

येत्या काही दिवसात अमेरिकी फौजा हळू हळू इराक मधनं बाहेर पडणार असल्याचं ए.एफ.पीच्या बातमीत म्हटलं आहे. ही प्रक्रिया हळू हळू आणि सुरक्षित पद्धतीनं राबवली जाईल, असंही सिली यांनी पत्रात नमूद केलं आहे. जहाल इस्लामिक गटांना रोखण्यासाठी इराकी फौजांना मदत म्हणून इराकमध्ये सुमारे ५ हजार २०० अमेरिकी सैनिक तैनात आहेत.

Exit mobile version