Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्यासाठी राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्यासाठी संसदेनं केलेल्या घटना दुरुस्तीला मंजुरी देण्यासाठी राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं.

गेली ७० वर्षे या आरक्षणाला मुदतवाढ दिली जात आहे. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महा, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गांवर राज्य कारभार करण्यास कटिबद्ध आहे, असं  राज्यपाल भागात सिंग कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणात म्हटलं.

अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या आणि  वंचितांचा उद्धार करण्यास राज्य कटिबद्ध आहे, असंही ते म्हणाले. गेल्या महिन्यात संसदेनं केलेल्या घटना दुरुस्तीला कमीत कमी सर्व राज्यांच्या विधिमंडळांनी ५० टक्के मंजुरी देणं आवश्यक आहे.

Exit mobile version