नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधल्या अमेरिकी लष्करी तळांवर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व काही आलबेल असल्याचं ट्विट केलं आहे. ट्रम्प यांनी गृहमंत्री माईक पॉम्पीओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.
ट्रम्प यांनी कतार, जर्मनी यांच्या प्रमुखांशीही दूरध्वनीवरुन चर्चा केली. कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं इराकमधल्या दोन अमेरिकी लष्करी तळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.