Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ईशान्य भारतात नैसर्गिक वायू पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी केंद्रसरकारकडून पाच हजार ५५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विषयावरील मंत्रीमंडळ समितीनं इंदधनुष्य गॅस ग्रीड लिमिटेडला, ईशान्य भारतात नैसर्गिक वायू पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी लागणाऱ्या भांडवल उभारणीतली तूट भरून काढण्यासाठी पाच हजार५५९ कोटी रुपयांचा निधी द्यायला संमती दिली.

ईटानगर, दिमापूर, कोहीमा, इंफाळ, आइजॉल आणि आगरतळा या प्रमुख शहरांना जोडणारी ही गॅस पाईप लाईन एक हजार ६५६ किलोमीटर लांबीची आहे. सरकारची हायड्रोकार्बनविषयक दृष्टी- २०३० लागू करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, त्यामुळे ईशान्य भारतातल्या आठ राज्यांचा विकास होईल, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

आर्थिक विषयावरील मंडळाच्या समितीनं निलाचल इस्पात निगम लिमिटेडमधे असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या चार केंद्रीय आणि दोन राज्य उद्योगांना उपक्रमातील आपला हिस्सा विकण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी दिली आहे. सामितीने ‘खनिज आणि धातू व्यापार महामंडळाला’ 49 पूर्णांक 78 टक्के भागाच्या तसंच राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या 10 पूर्णांक 10 टक्के भागाच्या निर्गुंतवणूकीला परवानगी दिली आहे. ‘मिकॉन’ आणि भारत हेवी इलेक्ट्रीक्लसच्या 68 टक्के समभागाच्या निर्गुंतवणूकीलाही परवानगी दिली आहे.

Exit mobile version