नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सार्वजनिक क्षेत्रातल्या सगळयात मोठ्या असलेल्या स्टेट बँकेनं, खरेदीदाराच्या हमीसह गृहप्रकल्प विकासकांना अर्थ पुरवठा करणारी योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे निवासी घरांच्या विक्रीला उत्तेजन मिळण्याबरोबरच गृहखरेदीदारांचा विश्वास वाढण्याची अपेक्षा आहे.
स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या निवडक गृहप्रकल्पांसाठी बँक गँरटी देणार आहे. सुरुवातीला दहा शहरातल्या अडीच कोटी रुपयां रुपयांपर्यंतच्या घरांसाठी ही योजना लागू करण्यात येईल.