मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होणे व त्या कायद्याबाबतची संवेदनशिलता या विषयावरील कार्यशाळा दि. ११ जानेवारी, २०२० रोजी, स. १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण केंद्र, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई-४०००२१ येथे आयोजित केली आहे.
ही कार्यशाळा आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे.