Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर इतकी करण्यासाठी भागधारकांनां विशेष प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री मोदींचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरइतकी करण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व भागधारकांनी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेची कल्पना ही अचानक घडलेली घटना नाही, तर देशाच्या सामर्थ्याचा सखोल अभ्यासानंतर ही कल्पना केली आहे, असं मोदी म्हणाले.

पर्यटन, नगरविकास, पाय़ाभूत विकास आणि कृषी आधारित उद्योग यांच्यात अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्याची आणि रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे, असंही ते म्हणाले. दोन तास चाललेल्या या बैठकीत प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणार्‍या  व्यक्ती तसंच विविध क्षेत्रातले तज्ञ यांच्यात विचारांची देवाण घेवाण झाली.

गृहमंत्री अमित शहा, परिवहनमंत्री नितीन गडकरी, वाणिज्यमंत्री पियूष गोयल, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, वरीष्ठ कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि अन्य वरीष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Exit mobile version