नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या सिन्थेटिक मांजा किंवा नायलॉन धागा मांजा हा पतंग उडविण्यासाठी मोठया प्रमाणात वापरला जातो. या मांजावर शासनानं बंदी घातली असून त्यांची विक्री करणं, साठवणं आणि वापरणं हा कायद्यानं गुन्हा आहे.
अशा व्यक्ती अथवा व्यापाऱ्यांविरुध्द मोठया प्रमाणात कार्यवाही करण्याची मोहिम वन विभागाच्या वतीनं हाती घेतली जाणार आहे.