Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आरक्षणाला मुदतवाढ देण्यासाठी गुजरात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती-जमातींना लागू असलेल्या राजकीय आरक्षणाला दहा वर्षे मुदतवाढ देण्याच्या १२६ व्या घटनादुरुस्तीला आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देणारा ठराव मंजूर करण्यासाठी गुजरात विधिमंडळाचं आज एका दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणानं आज अधिवेशनाला सुरुवात झाली. दुपारनंतर सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देणारा ठराव मांडण्यात येणार आहे. गुजरात विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

Exit mobile version