Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंधित एका आरोपीला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंधित एका आरोपीला विशेष तपास पथकानं काल झारखंड मधून अटक केली. विशेष तपास पथकानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली, असं या आरोपीचं नाव असून तो फरारी होता. गौरी लंकेश यांच्या हत्त्येच्या कटात तो सहभागी होता, असं तपास पथकाचं म्हणणं आहे. ५ सप्टेंबर २०१७ ला गौरी लंकेश यांची हत्या झाली होती.

Exit mobile version