नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि अवैधरित्या प्रलोभनं दाखवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागानं २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरु केला आहे.
या संदर्भात कोणालाही तक्रार करायची असल्यास १८००११७५७४ या विनामूल्य दूरध्वनीवर संपर्क साधण्याचं आवाहन आयकर विभागानं केलं आहे. निवडणूक खर्चाचा तपशील तपासण्यासाठी आयकर विभागानं २२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ८ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे.