Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात जनगणनेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, ही जनगणना येत्या, १ एप्रिल पासून सुरु होईल आणि ३० सप्टेंबर पर्यंत चालेल. या जन गणनेदरम्यान, जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन सूची तयार करण्याच्या दृष्टीनं, कुटुंबप्रमुखाचा भ्रमणध्वनी क्रमांक, शौचालय, दूरचित्रवाणी, इंटरनेट, वाहन त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा स्रोत यासह अन्य माहिती संकलित करतील.

जणगणनेदरम्यान प्रत्येक कुटुंबाच्या माहितीची यादी तयार करण्यासाठी एकूण ३१ प्रश्न विचारण्याचे निर्देश जनगणना आयुक्तांनी जनगणना अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही जनगणना एका मोबाईल अँप द्वारे केली जाणार आहे.

Exit mobile version