नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणविरोधात युद्ध करण्यासंदर्भातले निर्णय घेण्याबद्दलचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकार कमी करावेत अशा स्वरुपाचा प्रातिनिधिक ठराव अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं संमत केला आहे.
डेमोक्रेटिक्सचं वर्चस्व असलेल्या प्रतिनिधीगृहात हा ठराव २२४ विरुद्ध १९४ मतांनी संमत झाला. मात्र रिपब्लिकन्सचं वर्चस्व असलेल्या सिनेटमध्ये तो समंत करून घेण्याचं आव्हान डेमोक्रेटिक्समोर असणार आहे. अमेरिकेवरच्या मोठ्या हल्ल्यासारखी अपवादात्मक परिस्थितीत घेतलेले निर्णय वगळता, इराणसोबत सुरु असलेल्या संघार्षाबाबत घेतलेल्या इतर निर्णयांना काँग्रेसकडून समंती मिळवणं बंधनकारक असावं, अशी तरतूद या ठरावात केली आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी संभाव्य हिंसा टाळणं आणि हा संघर्ष संपुष्टात आणणं यासाठी प्रयत्न करावेत असं प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी म्हटलं आहे.