Site icon साप्ताहिक एकच ध्येय

युरोपीयन युनियनमधील राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री आणि नाटोचे महासचिव एका तातडीच्या बैठकीसाठी आज ब्रुसेल्स् इथं जमु लागले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय संघातल्या सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री आणि नाटोचे महासचिव आज ब्रसेल्स इथं तातडीची बैठक घेणार आहेत. या बैठकीत हे सर्व प्रतिनिधी इराणसोबत केलेल्या अणुकराराप्रती समर्थन व्यक्त करण्याची शक्यता आहे. दरम्यान इराणसोबतचा अणुकरार अजुनही संपुष्टात आलेला नाही आणि हा करार वाचवणं अत्यंत गरजेचं आहे असं फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जाँ वेस ले द्रायन यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये या करारातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतरही, तसंच सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतरदेखील, इराणसोबतच्या अणुकराराचं पालन करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याची भूमिका  युरोपीय महासंघानं कायम ठेवली आहे. त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
अलिकडेच अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा कमांडर कासीम सुलेमानी मारला गेला होता. त्यानंतर इराणनं, यापुढे आपण अणुकराराचं आणि त्याअंतर्गत असलेल्या कोणत्याही अटींचं पालन करणार नसल्याचं जाहीर केलं होतं.
Exit mobile version