Site icon साप्ताहिक एकच ध्येय

खेलो इंडिया स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांसह त्रिपुरा अग्रस्थानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममधे गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडास्पर्धेच्या कालच्या पहिल्या दिवशी जिम्नॅशियम प्रकारात, त्रिपुराची प्रियांका दासगुप्ता आणि उत्तर प्रदेशच्या जतिनकुमार कनौजिया यांनी सुवर्णपदक पटकावलं. तर तालबद्घ जिम्नॅशियम मध्ये महाराष्ट्राच्या अस्मी बदाडे हिनं सुवर्णपदक तर अस्मी बदाडे आणि श्रेया बंगाले हिनं रौप्यपदक पटकावलं.

कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या उपाशा तालुकदार हिनं कांस्य पदक मिळवून सर्वांची मनं जिंकली. पहिल्या दिवशी स्पर्धेत तीन सुवर्णपदकं पटकावून त्रिपुरा, पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे, तर दोन सुवर्णांसह एकूण नऊ पदकं मिळवून महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर आहे. स्पर्धेत आज विविध क्रीडास्पर्धा होणार आहेत.

Exit mobile version