Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुण्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी

पिंपरी : पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या आमदार आणि पालकमंत्री पदाचा मंगळवारी (दि.4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला राजीनामा दिला होता. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री कोण? होणार याची उत्सुक्ता लागली होती.

पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि पुणे जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नावांची पालकमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा होती.

पुण्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. तर, जळगावच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version