Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या दोन दिवसांच्या दौ-यावर जाणार आहेत, या दौ-यात ते गुजरात पोलीस आणि राज्य गृह मंत्रालयाच्या विविध प्रकल्पांचं गांधीनगरमधे उद्धाटन करतील.

त्यानंतर गांधीनगर रेल्वेस्थानकात अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि विविध सुविधांचं उद्धाटन करतील. गांधीनगरमधल्या गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आज संध्याकाळी ते नरणपूरा विधानसभा मतदारसंघातल्या निवासी संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिवांना संबोधित करणार आहेत.

Exit mobile version