Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आगामी काळात भारताला १०० टक्के साक्षर करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपाने काम करायला हवं – एम.व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात भारताला १०० टक्के साक्षर करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रितपाने काम करायला हवं. तामिळनाडू इथल्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं उद्धाटन केल्यानंतर उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू बोलत होते.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली तरीही १८ ते २० टक्के जनता निरक्षर आहे. साक्षरता अभियान आणखी  कार्यक्षम करायला हवं, असं ते म्हणाले. टाईमच्या ५०० जागतिक विद्यापीठाच्या यादीत भारताच्या केवळ ५६ विद्यापीठांना या यादीत स्थान मिळू शकलं आहे, असा खेद त्यांनी व्यक्त केला.

सध्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४ पूर्णांक ६ टक्के गुंतवणूक  शिक्षण क्षेत्रात केली जाते ती वाढवून ६ टक्के करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version