नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद मंत्रालय करत आहे, असं केंद्रीय पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं.
ते कोलकाता इथं ”पूर्वोदय” या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत हाते. पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा उत्तरभाग, झारखंड आणि ओदिशा मधल्या भागास जिल्ह्यांना पोलाद क्षेत्रातल्या विकासाद्वारे प्रगतीपथावर नेता येईल, असं ते म्हणाले.
2017 साली जाहीर झालेल्या राष्ट्रीय पोलाद धोरणात म्हटल्यानुसार, सरकारनं 2030 पर्यंत 300 दशलक्ष टन पोलादनिर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे आणि यापैकी 200 दशलक्ष टन पोलाद पूर्वेकडच्या पाच राज्यांमधे निर्माण झालेलं असेल, असा अंदाज असल्याची माहिती धमेंद्र प्रधान यांनी दिली.