नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेनं नवीन निर्बंध लावले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, माईक पॉम्पीओ यांनी दिली. त्याबरोबरच इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत.
इराणने अमेरिकेच्या इराक मधल्या हवाई तळांवर हल्ले केल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लावले गेल्याचं सांगितलं जात आहे. इराणवर आर्थिक निर्बंध लावण्याचे सूतोवाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आधीच केलं होते.
इराणच्या इस्लामिक रिपब्लिकन गार्डचे वरिष्ठ अधिकारी, अब्दुल रेझा शहलाई हे अमेरिकेच्या निशाणावर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.