नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनचं विमान पाडल्याप्रकरणी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी खेद व्यक्त केला आहे. चुकून क्षेपणास्त्र डागण्यात आल्यामुळे युक्रेनचं विमान कोसळून १७६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याचं सशस्त्र दलाच्या अंतर्गत तपासात आढळून आलं आहे, असं रुहानी म्हणाले.
ही मोठी दुःखद दुर्घटना असून, अक्षम्य चूक आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचं रुहानी यांनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे.