Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी काल संध्याकाळी निधन झालं. आखाती देशांमध्ये सर्वात जास्त काळ त्यांनी सत्ता उपभोगली. त्यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग झाला होता.

बेल्जीयम इथं त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाबद्दल ओमानमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. सुलतान काबूस यांनी १९७० साली त्यांचे वडील, सैद बिन तैमूर यांना सत्तेवरून खाली खेचत सत्ताग्रहण केली होती. तेव्हापासून गेली पाच दशकं त्यांनी ओमानवर आपली सत्ता कायम ठेवली होती.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुलतान यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिलं होतं, असंही मोदी म्हणाले.

Exit mobile version