नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आधीच्या सरकारच्या काळात २०१५ ते २०१९ दरम्यान राजकीय सुडबुद्धीनं ज्यांच्यावर खटले दाखल केले होते त्याची चौकशी करण्यासाठी काल सेवानिवृत्त न्यायमूर्ती उपाली अबेयरत्ने यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे.
सरकारी अधिकारी, कर्मचारी, सैन्यातले अधिकारी, आणि पोलीस अधिकारी यांच्यावर हे खटले दाखल केले होते. तसच खासगी गुंतवणूक कंपन्यांवर देखील अशाच पद्धतीनं खटले दाखल केले होते, त्याची चौकशी देखील केली जाणार आहे.