Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पूर्वेकडील भागांच्या विकासाकरता पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पूर्वोदय अभियानाची केली सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्वेकडील भागात देशाच्या एकूण क्षमतेच्या ७५ टक्के पोलाद उत्पादन करण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन केंद्रीय पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं. २०३०-३१ पर्यंत ३०० दशलक्ष टन पोलाद उत्पादनाचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. काल कोलकाता इथं ‘पूर्वोदय’ या अभियानाची त्यांनी सुरुवात केली.

पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण ७० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद मंत्रालय करत आहे, असं प्रधान यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेशचा उत्तरभाग, झारखंड आणि ओदिशा मधल्या मागास जिल्ह्यांना पोलाद उत्पादनाच्या माध्यमातून प्रगतीपथावर नेता येईल, असं ते म्हणाले.

Exit mobile version