Site icon साप्ताहिक एकच ध्येय

घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी म्हटलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटनात्मक महत्वाकांक्षा आणि सामाजिक सत्याचा वापर करुन न्यायदान हा सर्व न्यायाधीशांचा धर्म असला पाहिजे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी म्हटलं आहे. ते काल बंगळुरु इथं न्यायालयीन अधिकार्‍यांच्या न्यायिक प्रक्रिया आणि न्यायिक कौशल्य पुनर्बांधणी विषयक दोन दिवसीय परिषदेचं उद्धाटन केल्यावर बोलत होते.

व्यावसायिक सक्षमता आणि कायदेशीर ज्ञानामुळे न्यायदानाची गुणवत्ता वाढू शकते, असं बोबडे यांनी सांगितलं. लवाद, मध्यम तसंच समुपदेशनामुळे जिल्हा न्यायालयातली प्रलंबित प्रकरणं लवकर निकाली निघू शकतात, असंही ते म्हणाले. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि न्यायालयाचं डिजिटायझेशन प्रकरणांचा त्वरित निपटारा करायला उपयोगी ठरेल, असंही बोबडे यांनी सांगितलं.

Exit mobile version